🕒 1 min read
अहमदनगर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यातील भाषणानंतर राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. याच पार्श्ववभूमीवर राज ठाकरे यांच्या आदेशच पालन करत, अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून भोंग्यांचं वाटप करण्यात आले आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी शहरात व नगर तालुक्यातील काही मंदिरांना भोंग्यांचं वाटप केले आहे.धार्मिकता व हिंदूधर्म संस्कृती रक्षणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेने ही नेहमीच पुढाकार घेईल. आता पर्यंत ४० भोंगे वाटले असून, यापुढे जिल्हाभर हा भोंगा वाटपाचा कार्यक्रम राबविला जाईल.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अहमदनगर शहर व तालुक्यातील विविध धार्मिक स्थळांना भोंग्याचे वाटप करताना मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा, तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष संकेत जरे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.
“स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही”, हनुमान चालीसा प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची मनसेवर टीका
IPL 2022 KKR vs DC : दिल्लीच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये लढत; नाणेफेकीचा कौल कोलकाताच्या बाजूने!
उद्यानाला नगरसेवकाच्या वडिलांचं नाव देण्यास नागरिकांचा विरोध
“…त्यांचा हेतू स्वछ नव्हता”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
“केंद्र सरकारच्या राजकारणामुळे देशावर वीजेचे संकट” – नाना पटोलेंचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
