🕒 1 min read
मुंबई : रावसाहेब दानवेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. म्हणाले, शिवसेनेने दिवसाढवळ्या बगावत केली. दगाफटका केला. काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली आणि त्यांचं सरकार आलं, सरकार गेल्याचं दु:ख नाही. तुम्ही धोका दिल्याचं दु:ख आहे. अशी खोचक टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आम्ही 35 वर्ष विरोधात होतो. मी 35 वर्ष आमदार खासदार आहे. मी काही सत्तेत नव्हतो. लोकांनी युतीला डोळ्यासमोर ठेवून मतदान दिलं. मात्र आमच्याशी आणि मतदारांशी धोका झाला. पुढे उदाहरण देताना दानवे म्हणाले, आमचे नेते दत्तोपंत ठेंगडी होते. त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशात जायचो. तेव्हा ते एक उदाहरण द्यायचे. म्हणायचे, पूर्वी दुकानावर तुपाचे दुकान अशी पाटी असायची. आता शुद्ध तुपाचे दुकान अशी पाटी असते. याचा अर्थ भेसळ आहे हे स्पष्टच आहे.
शिवसेनेचं ही तसंच आहे. हिंदुत्व सोडलं नाही हे शिवसेना सांगते. याचा अर्थ त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे. तुम्ही हिंदू आहात, हिंदुत्ववादी आहात तर सांगायची गरज का पडते? काही शंका आहे का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे सांगाव लागत नव्हते. उलट लोकच त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणत होते. अशी सडेतोड टीका केली.
महत्वाच्या बातम्या –
केंद्र सरकारच्या राजकारणामुळे देशावर वीजेचे संकट” – नाना पटोलेंचा आरोप
IPL 2022 : चहलच्या धक्कादायक खुलाशानंतर मुंबई इंडियन्सच्या ‘त्या’ खेळाडूची चौकशी होणार; वाचा कोण आहे तो!
IPL 2022 : RCBचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन; मुंबईविरुद्धची मॅच खेळताना समजली वाईट बातमी!
“राज्यातले भाजपचे नेते कायद्याची ऐशी तैशी करायला निघालेत”; नाना पटोलेंचा घणाघात
“…तो मुद्दाम चित्रित केलाय”, कीर्तनकारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
