Share

भाजप-शिवसेना संघर्ष दिल्ली दरबारी, पक्षाचं शिष्टमंडळ गृहसचिवांच्या भेटीला!

Published On: 

दिल्ली : राज्यात सुरु असलेल्या भाजप आणि शिवसेना संघर्ष आता दिल्ली दरबारी पोहचला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या खार पोलीस ठाण्याबाहेरील हल्ल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्ली गाठली आहे. आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव यांना भाजपच्या शिष्टमंडळाने भेट दिली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आहे.

किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचं केंद्रीय गृहसचिव दिल्लीत दाखल झालं आहे. या शिष्टमंडळात किरीट सोमय्या यांच्यासह आमदार सुनील राणे, आमदार मिहीर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह आणि विनोद मिश्रा यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर आता किरीट सोमय्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीआधी किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भाजपचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिव यांना भेटणार आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांचा माफिया म्हणून वापर सुरु केला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनच्या आवारात हल्ला होतो. याची चौकशी झाली पाहिजे,” असं सोमय्या यांनी म्हंटले.

दरम्यान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!