🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या राणा दाम्पत्याला अटक तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. यावरच राष्ट्रवादी नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत भाजपला डिवचले आहे.
“राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान आजच किरीट सोमय्या तसेच भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेत झालेल्या प्रकरणाबाबत दाद मागणार आहेत. यासाठी सोमय्या दिल्लीत पोहोचले आहेत.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1518311741184221184
दरम्यान किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही पोलिसांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगड भिरकावला. यात सोमय्यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमय्यांचा एफआयआर दाखल करून घेण्यासही नकार दिला होता. त्यामुळे भाजपने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचे म्हणत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…ही किरीट सोमय्यांची जुनी खोड”, भास्कर जाधवांचे टीकास्त्र
- ‘त्या’ आजींचा सत्कार केला पाहिजे कारण.. ; ‘मनसे’ चा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
- “कोण हा रवी राणा? बाळासाहेबांनी तुझ्यासारख्या फडतूस माणसाला…”, भास्कर जाधवांचा हल्लाबोल
- “कोणीही उठून मंगेशकर कुटुंबियाबद्दल…”, जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचा टोला
- IPL 2022 LSG vs MI : रोहितसेनेचा खेळ खल्लास..! मुंबई इंडियन्सचा सलग आठवा पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
