🕒 1 min read
मुंबई: उदगीर येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अपेक्षित पुस्तक विक्री झाली नाही. संमेलनाला रसिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी वगळता रसिकांनी संमेलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
“साहित्य संमेलनात सामान्यांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी होती. पुस्तक खरेदीला कमी प्रतिसाद मिळाला आहे. खरंच ते साहित्य संमेलन होते का? महाराष्ट्रातील जनतेला तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संमेलन वाटत होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पुस्तक खरेदी काय संबंध आहे?”, असा खोचक सवाल करत अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1518444140366733312
दरम्यान तीन दिवसांत २१६ प्रकाशकांची एकूण दीड कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली असल्याचे राज्य मराठी प्रकाशक परिषदेने म्हटले. संमेलनात पुस्तक विक्रीची २८५ दालने होती यात २१६ प्रकाशक संमेलनात सहभागी झाले होते. मात्र तरी पुस्तकविक्री अपेक्षेनुसार झाली नाही. शनिवारी पुस्तकविक्रीलाही प्रतिसाद मिळाला होता. मात्र संमेलनाचा शेवटचा दिवस विक्रेत्यांसाठी निराशाजनक गेला.
महत्वाच्या बातम्या:
- “राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल”, जितेंद्र आव्हाडांनी भाजपला डिवचले
- “…ही किरीट सोमय्यांची जुनी खोड”, भास्कर जाधवांचे टीकास्त्र
- ‘त्या’ आजींचा सत्कार केला पाहिजे कारण.. ; ‘मनसे’ चा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
- “कोण हा रवी राणा? बाळासाहेबांनी तुझ्यासारख्या फडतूस माणसाला…”, भास्कर जाधवांचा हल्लाबोल
- “कोणीही उठून मंगेशकर कुटुंबियाबद्दल…”, जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
