Share

“अप्रतिष्ठित माणसाला आमंत्रण देऊन..”, ‘त्या’ घटनेवरून निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार काल (२४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये झालेल्या ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळय़ात या पुरस्काराने पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची उपस्थिती होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव आमंत्रण पत्रिकेवर नसल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली. यावरच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार समारंभासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण नव्हतं, प्रतिष्ठीत कार्यक्रमांपैकी हा कार्यक्रम होता म्हणून अप्रतिष्ठित माणसाला कार्यक्रमाला आमंत्रण देऊन कार्यक्रमाची उंची खाली आणायची नव्हती. कारणे अनेक आहेत पण टोमणेबाज माणूस कार्यक्रमाला नको, हे घडलं.”, असा टोला निलेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव न टाकल्याने अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला दांडी मारत काल सहकुटुंब शिवडीमधील शिंदे आजींच्या भेटीला गेले होते. मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये शिंदे आजी दिसून आल्या होत्या. त्यांचा पुष्पा स्टाईल ‘झुकेगा नही’ हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!