मुंबई: राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हनुमान चालीसा वाद, राज ठाकरे यांचे भाषण, राणा दाम्पत्याचा इशारा, भाजप नेत्यांवरील हल्ले तर आता भाजपची राष्ट्रपती राजवटीची मागणी यावरून ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. यावरच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot ) यांनी शेळक्या शब्दांत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय सूड नाट्य पाहता; राज्यातील जनतेसाठी राजकारण हा आजार असेल तर त्याचं मूळ मातोश्री आहे आणि औषध देवेंद्र फडणवीस सरकार आहे.”, असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय सूड नाट्य पाहता;
"महाराष्ट्रातील जनतेसाठी राजकारण हा आजार असेल तर त्याचं मूळ मातोश्री आहे आणि औषध देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) सरकार आहे."
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) April 25, 2022
दरम्यान राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा प्रकरणी अटक झाली आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. तर आज किरीट सोमय्या तसेच भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेत झालेल्या प्रकरणाबाबत दाद मागणार आहेत. यासाठी सोमय्या दिल्लीत पोहोचले आहेत. आता यापुढे काय घडामोड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पुस्तक खरेदी काय संबंध?; अतुल भातखळकरांचा टोला
- “राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल”, जितेंद्र आव्हाडांनी भाजपला डिवचले
- “…ही किरीट सोमय्यांची जुनी खोड”, भास्कर जाधवांचे टीकास्त्र
- ‘त्या’ आजींचा सत्कार केला पाहिजे कारण.. ; ‘मनसे’ चा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
- “कोण हा रवी राणा? बाळासाहेबांनी तुझ्यासारख्या फडतूस माणसाला…”, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

