बुलडाणा : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा शनिवारी कार्यकर्त्यांसह (२३ एप्रिल) मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. दरम्यान शिवसेना आक्रमक झाली आहे. राणा कुटुंबाने मोतोश्रीवर येऊन दाखवावे, आम्ही त्यांचा चांगला पावनचार करु, असे आव्हान शिवसेनेने केले आहे. यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना, राणा कुटुंबासह राज ठाकरे आणि किरीट सोमय्या यांच्यावर तिखट शब्दात निशाणा साधला आहे.
संजय गायकवाड म्हणाले, “हे राणा कुटुंब राष्ट्रवादीच्या भरवश्यावर निवडून आले आणि चमचेगिरी भाजपची करतात. भाजपने भुंकणारे अनेक कुत्रे सोडले आहेत. राज ठाकरे, राणे, सोमय्या आणि आता हे राणा कुटुंब. पाकिस्तानचे आतंकवादी मातोश्रीवर पोहचू शकले नाही तर हे टपरूट काय पोहोचतील. मातोश्रीला शिवसैनिकांचे कवच कुंडल आहे, हे गेले तरी पूजापाती होऊन पावनचार करून परत येतील”
“हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मोतोश्री हे शिवसेनेचे मंदीर आहे. ती काही मस्जिद नाही. स्वताच्या प्रसिद्धी करीता राणा कुटुंब चमचेगिरी करत आहे”, असे देखील संजय गायकवाड म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
२ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला होता. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला होता.
शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष तीव्र
आमदार रवी राणा हे मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यावर ठाम आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी राणा यांनी २३ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. त्यांच्यासोबत ५०० हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत. आमदार रवी राणांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

