🕒 1 min read
मुंबई : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याला टीम मॅन म्हटले जात होते. रैना हा खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ओळखला जात असे. तो एक हुशार क्षेत्ररक्षक होता, जो मैदानात क्षेत्ररक्षण करून अनेक धावा रोखायचा आणि कठीण झेल पकडण्यात तो उत्कृष्ट मानला जात असे. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रैना खेळत नाही. तो अनसोल्ड ठरला होता.
रैना असा खेळाडू होता ज्याने प्रत्येक गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला प्रोत्साहन दिले. मैदानाबाहेरही रैनाने तरुणांना प्रोत्साहन दिले. याचे उदाहरण सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी आहे. त्यागीला २०२० अंडर-१९ विश्वचषकातून ओळख मिळाली, जिथे तो भारतासाठी सर्वाधिक (११) बळी घेणारा गोलंदाज बनला.
त्याच वर्षी आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला २० लाख रुपयांना विकत घेतले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातही त्याचे नाव आले. त्यागीला यंदा सनरायझर्स हैदराबादने 4 कोटी रुपयांना खरेदी केले. फ्रेंचाइजीच्या एका व्हिडिओमध्ये कार्तिक त्यागी म्हणाला, ”मी नेहमी एक गोष्ट सांगतो. अंडर-१६ नंतर सुरेश रैना माझ्या आयुष्यात देवासारखा आला, कारण जेव्हा माझी रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली तेव्हा लोकांनी मला ओळखले. जेव्हा मी १३ वर्षांचा होतो, तेव्हा मी अंडर-१४ चाचण्या दिल्या आणि हीच माझ्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात आहे.”
With @ImRaina in his corner, @tyagiktk kept going UP, UP, and away. ????????????#OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/HrDusmrjRb
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 19, 2022
त्यागी पुढे म्हणाला, ”मी अंडर-१४ संघातून खेळायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझी १६ वर्षाखालील संघात निवड झाली. अंडर-१६ मध्ये मी एका मोसमात फक्त ७ सामन्यात ५० विकेट घेतल्या. त्यानंतर निवड समितीच्या लक्षात आले की एक गोलंदाज आहे जो राज्य स्तरावर भरपूर विकेट घेत आहे. अनेक विकेट घेतल्यानंतरही आम्ही अंतिम फेरी गाठली आणि हरलो. तेव्हा ज्ञानेंद्र सरांनी माझी परीक्षा घेतली आणि सांगितले की ते माझ्या कामगिरीने प्रभावित झाले आहेत आणि ते मला पुढे जाण्यास मदत करतील.”
कार्तिक त्यागी पुढे म्हणाला, ”तेथून मी राज्यातील रणजी ट्रॉफी कॅम्पमध्ये पोहोचलो. जेव्हा मी आलो तेव्हा मी १६ वर्षांचा होतो, बाकी सर्व प्रस्थापित खेळाडू होते. सुरेश रैनाही तेव्हा होता, तेव्हा मी खूप शांत राहायचो आणि गोष्टींचे निरीक्षण करायचो. रैना माझ्याशी बोलला आणि संघात माझी भूमिका काय आहे, असे विचारले. मी त्याला सांगितले की मी गोलंदाज आहे. त्यानंतर त्याने मला नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. त्याने माझी कामगिरी पाहिली आणि सांगितले की मला तुझी गोलंदाजी आवडली आणि मी तुला खात्री देतो की मी तुला भविष्यात संधी देईन.”
“सुरेश रैनासारख्या खेळाडूने माझ्या कामगिरीकडे लक्ष दिले ही वैयक्तिकरित्या माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. एवढ्या मोठ्या खेळाडूने माझे कौतुक केले याचे मला थोडे आश्चर्य वाटले. मला वाटले की तो विनोद करत आहे. मी चांगली कामगिरी करत आहे, असे त्याने सांगितल्यावर मला यावर विश्वास बसत नव्हता”, असेही त्यागीने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
