Share

IPL 2022 : मुंबई इंडियन्सला धोक्याचा इशारा..! मॅचपूर्वी CSK संघात दाखल झाला ‘ज्युनियर मलिंगा’; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (CSK vs MI)सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या संघात एका नव्या खेळाडूचा प्रवेश झाला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेच्या दुखापतीनंतर त्यांच्या जागी चेन्नईने ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पाथिरानाचा (Matheesha Pathirana) संघात समावेश केला आहे. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मिल्नेला दुखापत झाली होती आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

मिल्नेच्या जागी चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील झालेला पाथिराना हा १९ वर्षीय श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज आहे. २०२० आणि २०२२ मध्ये पाथिराना श्रीलंकेच्या अंडर १९ विश्वचषक संघाचा भाग होता. चेन्नईने त्याला २० लाखांच्या किमतीत आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

आयपीएलमधील बदली खेळाडूंच्या यादीत समाविष्ट होणारा पाथिराना हा सहावा खेळाडू ठरला आहे. सीएसकेने अद्याप दीपक चहरच्या बदली खेळा़डूची घोषणा केलेली नाही. दीपक चहरचा चेन्नईने १४ कोटी रुपये खर्चून आपल्या संघात समावेश केला होता, मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चेन्नईव्यतिरिक्त, राजस्थान रॉयल्सने देखील नॅथन कुल्टर-नाईलच्या बदलीची घोषणा केलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!