पुणे : ब्राह्मण संघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत आहे. मिटकरींनी त्यांच्या भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला असं, ब्राह्मण महासंघाने म्हटले आहे. यावरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर ब्राम्हण महासंघाने जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांत जोरदार झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.
ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते गुरुजींच्या वेशात आले होते. यावेळी त्यांनी कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचं दिसतास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यातूनच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाकडून करण्यात येत आहे. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले हास्य आवरले नाही.
ब्राम्हण महासंघाच्या विरोधानंतर अमोल मिटकरींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नाही, भाषणात मी अपशब्द वापरले नाही.
धनंजय मुंडेकडून पाठराखण
“मिटकरी यांनी केलेले वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं ते व्यक्तिगत भाष्य होतं. राष्ट्रवादी म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला” असं म्हणत मुंडे यांनी मिटकरी यांची पाठराखण केली आहे.
दरम्यान जात पात धर्म हे आमच्या अंगाला देखील शिवले नाही. ते जे बोलले ते वैयक्तिक बोलले, अमोल मिटकरी याबाबत स्वतः स्पष्टीकरण देतील, असं धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

