Share

Nilesh Rane : “उद्धव ठाकरे म्हणजे रोजची नाटक कंपनी…”; निलेश राणेंची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

Nilesh Rane । मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या सत्तेत भाजपाने पुन्हा बाजी मारली. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे आणि राणे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. निलेश राणे यांच्या कडून सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे तसेच त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. शिवसेनेतील बंडखोरीलाही उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याचे अनेक वेळा राणेंनी टीका करताना म्हटले आहे.

‘काय नाटक आहे… लोकांना कामाशी घेणं देणं असतं, ढोंग नाटकं काही ठराविक दिवसांपुरतेच चालतात. उद्धव ठाकरे म्हणजे रोजची नाटक कंपनी झाली आहे, काम काही नाही फक्त फालतुगिरी.’अशा शब्दात निलेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून भाजपच्या नेत्यांकडून वारंवार उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले होते की, आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. मात्र तुमची ताकद मला हवी आहे. लढायचे असेल तर सोबत राहा. असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्यावर निशाणा साधत टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हात मिळवून सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्याचा कारभार हाती घेतला आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत हे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. तसेच आदित्य ठाकरे ही वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे घेतले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!