Share

Waterfall :अहमदनगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोल्यात पर्यटकांची तुफान गर्दी

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मागील पाच दिवसांपासून मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी बरसत आहेत. यामुळे या परिसरातील डोंगररांगा ओल्याचिंब झाल्या असून, सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या गिरी शिखरांवरून पांढरेशुभ्र धबधबे कोसळू लागले आहेत .

यामुळे अहमदनगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील मुळा भंडारदरा धरण परिसरात निसर्गाचे सौंदर्य पाहायला मिळत आहे. दरम्यान भंडारदारा धरण परिसरात आषाढ सरींची बरसात होत असून हा परिसर धुक्यात हरवून गेला आहे. साम्रद गाव आणि घाटघरचा कोकण कडा यांवर धुक्याची चादर पसरतली आहे. हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांतूनही आता धबधबे कोसळू लागले आहेत. हि पर्यटन पंढरी आता पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. मान्सून सुरु होऊनही घाटघर , हरिश्चंद्रगड ,रतनवाडी तसेच पांजरे या परिसरात पावसाचे आगमन उशिरा झाले. जुलै महिन्यात मात्र हा परिसर ओलाचिंब झाला आहे. .उंचच उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडू लागले आहेत. कोलटेभे फॉल , न्हाणी फॉल, नेकलेस फॉल , बाहुबली फॉलबरोबरच इतर लहान मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!