🕒 1 min read
President Election 2022 । मुंबई : अखेर पक्षात मोठ्या बंडखोरीनंतर शिवसेना नरमण्याची चिन्हे आहेत. शिवसेना एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकते. याबाबतची औपचारिक घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. असे संकेत देत पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनीही या निर्णयाचे कारण दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “सोमवारी आम्ही शिवसेनेच्या बैठकीत द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. मुर्मूला पाठिंबा दिल्याचा अर्थ आम्ही भाजपला पाठिंबा देत आहोत असा होत नाही. आदिवासी नेत्याच्या नावाने आपण द्रौपदी मुर्मू यांचे समर्थन करू शकतो. आम्ही यापूर्वीही असे निर्णय घेत आलो आहोत. शिवसेना कोणाला पाठिंबा देणार, हे एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील.”
विरोधी पक्ष टिकला पाहिजे. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याबद्दलही आमची सदिच्छा आहे. यापूर्वी आम्ही राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्या एनडीएच्या उमेदवार नव्हत्या. प्रबन मुखर्जी यांनाही आम्ही पाठिंबा दिला. शिवसेना कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही, असे राऊत म्हणाले.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी मुर्मू यांच्या समर्थनार्थ मत व्यक्त केले. या बैठकीत संजय राऊत एकाकी पडल्याचे सांगण्यात येत असून त्यांनी शिवसेनेचे संयुक्त विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. पक्षाच्या बहुतांश खासदारांच्या मताशी सहमती दर्शवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करू शकतात, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
