Share

Nilesh Rane : ‘रोज उठून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाची…’; निलेश राणेंची खोचक टीका

Published On: 

मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या सत्तेत भाजपाने पुन्हा एकदा बाजी मारली. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे आणि राणे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. राणेंकडून सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे तसेच त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. शिवसेनेतील बंडखोरीलाही उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याचे अनेक वेळा राणेंनी टीका करताना म्हटले आहे. रोज उठून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाची फक्त रड रड सुरू आहे. अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा खोचक टीका केली आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरेंनी दाखवलं कसं लढावं. उद्धव ठाकरेंनी दाखवलं कसं रडावं. रोज उठून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाची फक्त रडारड सुरू आहे. अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राणे कुटुंब नेहमीच ठाकरे घराण्यावर टीका केल्यामुळे चर्चेत राहिले आहे. राणेंकडून या अगोदरही अनेक वेळा शिवसेनेवर टीका केलेली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील महा विकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हात मिळवून सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्याचा कारभार हाती घेतला आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत हे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. तसेच आदित्य ठाकरे ही वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे घेतले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!