🕒 1 min read
Bharti Singh । महाराष्ट्र देशा डेस्क: आपल्या खास शैलीत कॉमेडी करून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध जोडी म्हणजेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया. यावर्षी एप्रिल महिन्यात हर्ष आणि भारतीच्या घरी लहान सदस्याचे आगमन झाले. मुलाला जन्म दिल्याच्या आठवडाभरातच भारती पुन्हा कामावर रुजू झाली. या दरम्यान भारती आणि हर्ष नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून त्यांच्या बाळाचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत असतात. मात्र आतापर्यंत त्यांनी त्यांच्या बाळाचा चेहरा मात्र स्पष्टपणे दाखवला नव्हता. त्यामुळे चाहते त्यांच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते.
भारती आणि हर्ष यांनी बाळाचे नाव ‘लक्ष्य’ उर्फ ‘गोलू’ असे ठेवले आहे. गोलू आता तीन महिन्यांचा झाला असून नुकतेच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर गोलूची पहिली झलक दाखवली आहे. या जोडीने मुलाबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
भारती सिंगने शेअर केला व्लॉग
भारतीने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट केला. ज्यात तिने गोलूचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. “अनेक दिवसांपासून चाहत्यांची इच्छा होती कि मी मुलाचा चेहरा दाखवावा. मला अनेक कॉमेंट्स आणि मेसेज येत होते. काह्ही लोक टोमणे ही मारत होते. त्यामुळेच आज मी गोलूचा चेहरा दाखवण्याचं ठरवलं आहे”, असे भारती या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. पुढे भारती म्हणते कि, गोलूला दाखवण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. पण तो आता झोपला आहे त्यामुळे मला थोडी तयारी करू द्या. कारण मी माझं बाळ पहिल्यांदाच दाखवणार आहे मग तो हिरोसारखा दिसायला हवा ना? त्यानंतर काही वेळातच भारतीने गोलूला कॅमेऱ्यासमोर आणले आणि चाहत्यांची इच्छा पूर्ण केली.
https://www.instagram.com/p/Cf4FXNiq6X8/?utm_source=ig_web_copy_link
यासोबत भारती सिंगने तिच्या मुलाचे काही फोटोही शेअर केले आहेत. नुकतेच भारती आणि हर्षने मुलगा लक्ष्यबरोबर फोटोशूट केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सची बरसात होत आहे. हे फोटो शेअर करताना भारतीने विचारले की, “गोलू कोणावर गेला आहे? आईवर की पप्पावर”. याचे उत्तर अनेकांनी ‘पप्पावर गेला आहे’, असेच दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
