🕒 1 min read
मुंबई : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अटकेची टांगती तलावर कायम आहे. जयकुमार गोरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. साताऱ्या जिल्ह्यातल्या मायणी येथील जमिनीच्या वादाप्रकरणी गोरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. जयकुमार गोरेंच्या जामीन अर्जाला राज्य सरकारचाही विरोध आहे. मात्र जयकुमार गोरेंना तातडीने कुठलीही अटकेपासून संरक्षण न्यायालयाने दिलेले नाही. अटकेची टांगती तलावर कायम असून कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
येत्या १७ तारखेला राज्य सरकारने यावर आपलं म्हणणं सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र राज्य सरकारनेही जयकुमार गोरेंच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. आता पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. मायणी या गावातील एक जागा गोरेंनी महाविद्यालयासाठी उभं करण्यासाठी घेतलेली होती. या जागेकडे जाणारा रस्ता दुसऱ्या व्यक्तीच्या जागेतून जातो. सदर जागेच्या मालकासोबत जमिनीचा दाखवण्यात आलेला करार बोगस आणि बेकायदेशीर असल्याचा दावा करत महादेव भिसे या व्यक्तीने तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार दहीवडी पोलिसांनी जयकुमार गोरे यांच्यासोबतच अन्य सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
या सहा जणांमध्ये सदरील भागातला तलाठीही सहभागी असून तो सद्या फरार आहे. अन्य आऱोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. वडूज इथल्या न्यायालयानेही गोरेंचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर निर्णयाला गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता इथेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

