Share

IPL 2022 : खरं की काय..! डिव्हिलियर्स RCB संघात परतणार? विराट कोहलीचे संकेत; म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्सबाबत नवी माहिती दिली आहे. विराटला आशा आहे की त्याचा मित्र आणि डिव्हिलियर्स पुढील वर्षी बंगळुरू संघात परत येईल. डिव्हिलियर्स हा आरसीबीचा अविभाज्य भाग होता, परंतु त्याने गेल्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

विराट कोहली आरसीबीच्या ट्विटर हँडलवरील संभाषणात म्हणाला, ”मला एबी डिव्हिलियर्सची खूप आठवण येते. मी डिव्हिलियर्सशी नियमितपणे बोलतो. नुकताच तो आपल्या कुटुंबासह अमेरिकेत गोल्फ पाहण्यासाठी गेला होता. तो आरसीबीच्या कामगिरीवर लक्ष ठेवतो आणि पुढच्या वर्षी तो संघासोबत काही भूमिकेत असेल अशी अपेक्षा आहे.”

विराट कोहली आयपीएल २०२२मध्ये सर्वात वाईट फॉर्मशी झुंज देत आहे आणि १२ सामन्यांमध्ये त्याला केवळ २१६ धावा करता आल्या आहेत. तो तीनवेळा शून्यावर बाद झाला आहे. कोहली म्हणाला, ”माझ्या कारकिर्दीत असे कधीच घडले नाही. मी फक्त हसतो. मला वाटते की खेळाने मला काय दाखवायचे आहे ते त्याने मला दाखवले आहे.”

”मी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि टीकाकारांना दुर्लक्षित करतो. ते माझी जागा घेऊ शकत नाहीत आणि मला काय वाटते ते विचारही करू शकत नाहीत. ते क्षण जगू शकत नाही. मी एकतर टीव्हीचा आवाज बंद करतो किंवा मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. फाफ डु प्लेसिस आणि माझ्या मनात एकमेकांबद्दल खूप आदर आहे. आमचा खूप चांगला संबंध आहे”, असेही कोहलीने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!