🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती. आता ११ दिवसानंतर राणा दाम्पत्याला जामीन मिळाला. यांनतर रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला केला.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येक सभेत आपण मर्द असल्याचं सांगतात. मात्र नवनीत राणा यांच्यासारख्या मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून त्यांनी नामर्दासारखं काम केलं आहे. दिवंगत बाळासाहेबही हे पाहून दु:खी होत असतील आणि विचार करत असतील की कोणाच्या हातात शिवसेनेचा कारभार गेला आहे” असं म्हणत अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. जामीन मिळाल्या नंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.
राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाची नोटीस-
न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. पण या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत. घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही. तसेच पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

