Share

IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या संघात स्थान नाहीच..! करतोय ‘हे’ काम; VIDEO व्हायरल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई इंडियन्स संघाची आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये अत्यंत खराब कामगिरी राहिली आहे. संघ आणि चाहत्यांसाठी यंदाचा हंगाम एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. इतर सर्व संघ प्लेऑफमध्ये जाण्याची धडपड करत आहेत. तर दुसरीकडे मुंबई प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. दरम्यान यावेळी चाहत्यांनी टीममध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश करावा अशी मागणी केली होती. मात्र त्याला संधी देण्यात आली नाही. पण अशा परिस्थितीत अर्जुनने त्याची एक वेगळी झलक लोकांसमोर आणली आहे.

मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीयो स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. यामध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर कुकींग करताना दिसतोय. चिकन रोस्ट करत असल्याचा अर्जुनचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याला धवल कुलकर्णीने मास्टरशेफ असे कॅप्शन दिले आहे.

अर्जुन तेंडुलकरसोबतच बेबी-एबीडी म्हणजे डेवाल्ड ब्रेविसने देखील कुकिंगचा आनंद घेतला. अर्जुनला अजूनही मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये खेळण्यासाठी संधी देण्यात आलेली नाही.

अर्जुन तेंडुलकरला आयपीएल (IPL 2022) मध्ये मुंबई संघाने 30 लाख रुपयांना खरेदी केले होते. अर्जुन तेंडुलकरला आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामामध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामामध्येही तो अजून पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!