Share

BJP vs Congress | भाजप नेत्याने छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याच्या व्हिडीओवर भाजपने दिले प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोशल मीडियावर भाजपच्या एका मंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यास सांगितल्यावर चिडचिड करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नसून मध्यप्रदेशमधला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी ते जाम सावली मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर सौसरला एका कार्यक्रमासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांना तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यास सांगितलं. मात्र त्यावर ते भडकले आणि त्यांनी हार घालायला टाळाटाळ केली. हा व्हिडीओ शेयर करत काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली. तर याच प्रकरणावर आता भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे.

हा व्हिडीओ शेयर करत काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिण्यात आले होते कि, “भाजपवाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करता, मतं मागता पण त्यांच्या प्रतिमेला हार घालायला सांगितल्यावर, हे माझ्या दौऱ्यात नव्हतं म्हणत हातपाय आपटत पुतळ्याला हार घालता शिवरायांचा अपमान केला. भाजप नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज फक्त सत्ता मिळवण्यापुरते हवे असतात का?” तर यावर आता भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यात भाजपने लिहले आहे कि, ” ज्या महाराष्ट्र काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यासाठी ’10 जनपथ’ ची परवानगी घ्यावी लागते, त्यांनी खोटे ट्विट करू नये. आमच्या भाषणाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत असं छातीठोक पणे सांगतो.” तर या घटनेमुळे राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप असे ट्विटर वॉर चालू झाले असल्याची चर्चा होत आहे.

काय आहे प्रकरण?

मंत्री गिरीराज सिंह हे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी तिथे उपस्थित कार्यकर्ते शिवाजी महाराजांचा जयघोष करत गिरीराज सिंह यांना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या दिशेने घेऊन जात होते. त्याचवेळी गिरीराज यांनी घोषणाबाजी थांबवली आणि भाजपचे स्थानिक नेते संतोष जैन यांच्यावर चिडले. “तुम्ही मला इकडे चला तिकडे चला असं का करताय? आम्हाला कार्यक्रमाबद्दल काही माहितीच दिलेली नाही.”, असं म्हणत ते उपस्थित कार्यकर्त्यांवर डाफरले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचा राग शांत करत त्यांना पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती केली. त्यांनतर गिरीराज यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!