मुंबई : कोरोना संसर्गामुळे दोन वर्षानंतर आज राज्यभरात मोठ्या जल्लोषात दहीहंडी साजरी केली जात आहे. सर्वत्र जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते देखील दहीहंडी उत्सवाचा आयोजन करताना दिसत आहेत. मात्र अशातच दहीहंडी उत्सव दरम्यान अनेक नेत्यांचं ट्विटर वाॅर देखील पाहायला मिळत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे ट्विट चांगलेच चर्चेत आहे.
चित्रा वाघ यांचं ट्विटः
यादरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांच्या बँड पथकाचा एक व्हिडिओ शेअर करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस पथक मच गया शोर सार नगरी रे या गाण्यावर धुन वाजवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे.
चित्रा वाघ यांच्या ट्विटचं कॅप्शनः
व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र सरकार काय बदललं सगळा फिका मोहोलच बदलला, असं कॅप्शन चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटवर लिहलं आहे. चित्र वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांनी वाजवलेल्या धूनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
पाहा ट्विटः
जन्माष्टमी निमित्त मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने "मच गया शोर सारी नगरी रे" च्या धूनवर जल्लोष केला…महाराष्ट्रात सरकार काय बदललं, सगळा फिका माहोलच बदलला… @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @MumbaiPolice pic.twitter.com/uJxGz8foIM
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 19, 2022
महत्वाच्या बातम्याः
- Devendra Fadnavis | हे मुठभर लोकांचे सरकार नाही ; देवेंद्र फडणवीसांचे तुफान भाषण
- Trupti Desai | “…आशीर्वाद तरी मिळतील” ; तृप्ती देसाईंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला
- Nitish Kumar | “नितीश कुमार हे विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे पर्याय असू शकतात जर…”, जेडीयूने दिले मोठे संकेत
- National Family Health Survey | देशातील महिलांचे सेक्स पार्टनर पुरुषांपेक्षाही अधिक, मात्र पुरुष…; वाचा काय आहे हा अहवाल
- Nitin Gadkari | भारतीयांनी लोकसंख्या आणि गाड्यांचा नंबर वाढवण्यात विक्रम केलाय – नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

