Share

Amol Mitkari | “सुरत व गुवाहाटीतुन मलाई खाऊन टुम झालेल्या 40 गरीब गोविंदांना…” ; मिटकरींचा शिंदे गटावर प्रहार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दहीहंडी निमित्त आज राज्यभरात मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर अनेक नेत्यांनी मोठ्या जल्लोषात दहीहंडीचं आयोजन केलं आहे. यादरम्यान अनेक नेते एकमेकांवर टीका देखील करताना दिसत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलेल्या भाषणातील एका वाक्यची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या याच वाक्याला जोरदार उत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरींचा निशाणाः

अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही मलई गोरगरिबांपर्यंत पोहोचवू, असं वक्तव्य केलं होतं. यावर आता कदाचित सुरत व गुहाटीमध्ये बसून गल्लेलठ्ठ मलाई खाऊन टुम झालेल्या चाळीस गरीब गोविंदांना ठाण्याहून आणलेल्या मलाई बाबत बोलले असावेत, असा टोला मिटकरी यांनी लगावला.

पाहा ट्विटः

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!