Udayanraje Bhosale | सातारा : आज दहीहंडी आहे तर याच महिन्याच्या अखेरीस गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. अशा सणांच्या काळात विशेष म्हणजे गणपतीमध्ये गणेशाची मिरवणूक वाजत-गाजत काढवी अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. परंतू अशातच सर्वोच्च न्यायालयाने डेसिमलच्या मर्यादेनुसार डॉल्बी वाजवा ,असे आदेश दिले आहेत. याचसंदर्भात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला एक सवाल केला आहे.
डॉल्बीवर बंदी का घालताय?, असा प्रश्न करत. दोन-तीन तास डॉल्बी वाजल्याने असे काहीही गंभीर परिणाम होत नाहीत. मग तरीही डॉल्बीवर बंदी घालून या उद्योगात गुंतवणूक करणाऱ्यांवर एवढा अन्याय का केला जातोय?. तुम्हाला बंदी घालायचीच आहे तर ज्या गोष्टींमुळे कँसर होतो अशा व्यवसायांवर आधी बंदी घाला, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
तसेच डॉल्बीच्या व्यवसायात अनेक गरीबांनीही गुंतवणूक केलेली असते. त्यांचाही विचार झाला पाहिजे. आज शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या हुद्द्याप्रमाणे भरपूर वेतन मिळतं. लोकप्रतिनिधी सांगणारे कोण? या अँगलने कोणी बघणार आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे. यानंतर येणाऱ्या उत्सवांच्या काळात सगळीकडे या आदेशाचे पालन करण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून केले जात असल्याचं पाहायला मिळतं आहे.
त्याचबरोबर यावर सातारा शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सातारा पोलिसांनी मात्र डॉल्बीला परवानगी देता येणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार डेसिमलच्या मर्यादेनुसार साऊंड सिस्टम लावावेत. कायद्याच्या नियमात कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेले आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | हे मुठभर लोकांचे सरकार नाही ; देवेंद्र फडणवीसांचे तुफान भाषण
- Trupti Desai | “…आशीर्वाद तरी मिळतील” ; तृप्ती देसाईंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला
- Nitish Kumar | “नितीश कुमार हे विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे पर्याय असू शकतात जर…”, जेडीयूने दिले मोठे संकेत
- National Family Health Survey | देशातील महिलांचे सेक्स पार्टनर पुरुषांपेक्षाही अधिक, मात्र पुरुष…; वाचा काय आहे हा अहवाल
- Nitin Gadkari | भारतीयांनी लोकसंख्या आणि गाड्यांचा नंबर वाढवण्यात विक्रम केलाय – नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

