Share

Bisexual couple’s love story । ‘सरहद’ ना प्यार को रोके; अंजली आणि सुफीची अजब लव्हस्टोरी

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : सोशल मीडियावर ओळख होऊन प्रेम जुळणं ही काही नवीन गोष्ट नाही. सध्याच्या काळात बहुतांश लव्हस्टोरीज या सोशल मीडियावरच जन्म घेतात. अशीच एक अनोखी लव्हस्टोरी आहे अंजली आणि सुफीची. अंजली चक्र ही भारतीय असून सुफी मलिक ही पाकिस्तानी आहे. या दोन समलैंगिक तरुणींची लव्हस्टोरी सध्या जगभर गाजत आहे.

व्यवसायाने वेडिंग प्लॅनर असलेली अंजली ही एका मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनतर काही कारणावरून तिचे ब्रेकअप झाले. यामुळे ती खूपच दुःखी होती. त्याचवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख सुफीशी झाली. सुफी ही एक कलाकार आहे. सुरुवातीला या दोघीनींही खूप गप्पा मारल्या, एकमेकींचे विचार जाणून घेतले. त्यानंतर अंजलीला कळलं की सुफी ही देखील तिच्यासारखीच समलैंगिक आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात भेटायचं ठरवलं आणि त्यांची पहिली भेट झाली ती न्यूयॉर्क मध्ये. सुफीला पाहता क्षणी अंजलीला ती आवडली होती. पुढे त्यांच्या भेटी होत राहिल्या आणि भेटीचं रूपांतर प्रेमात झालं.

https://www.instagram.com/p/B7RJTTHFcEd/?utm_source=ig_web_copy_link

सध्या या दोघी न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्यांनी बरेच दिवस त्यांचं हे नातं जगापासून लपवून ठेवलं होतं. पण काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावरून जगजाहीर केलं आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली असून त्यांचे फॉलोवर्स सुद्धा वाढले आहेत. नुकतीच त्यांच्या रिलेशनशिपला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नात्यात हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान असा कोणताच भेदभाव नाही. आहे ते फक्त प्रेम.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!