🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क, नवी दिल्ली: सध्या कार निर्मिती करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कार्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिले आहेत. कारची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक डिस्काउंटसह इतर अनेक ऑफर दिल्या जात आहेत. मारुती, रेनॉल्ट आणि महिंद्रा नंतर आता ही ऑफर देणाऱ्या कंपन्यांमध्ये ह्युंदाई मोटर्सचेही नाव जोडले गेले आहे. Hyundai Motors जुलै महिन्यात त्यांच्या निवडक कारवर ऑफर देत आहेत, हॅचबॅक कारपासून ते सेडानपर्यंत या ऑफर लागू आहेत. मात्र या ऑफर फक्त 31 जुलैपर्यंत वैध आहेत. परंतु ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या ऑफर वाढवता येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हीही ह्युंदाई मोटर्सची कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या कारवर कोणती ऑफर मिळणार आहे.
Hyundai Xcent: Hyundai Xcent ची गणना कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये केली जाते, ज्यावर तुम्हाला 50 हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे. कंपनी या कारवर 50,000 रुपयांचं कॅश डिस्काउंट देत आहे.
Hyundai Santro: Hyundai Santro ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. या कारचं बेस मॉडेल खरेदी करण्यावर 10 हजार रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, तुम्ही या कारचे इतर मॉडेल खरेदी केल्यास तुम्हाला एक 15 हजार रुपयांची सूट मिळेल तसेच यासोबतच 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जाईल.
Hyundai Kona: Hyundai Kona ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक SUV आहे. जी तिच्या खास डिझाइन आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते. कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या खरेदीवर 50,000 रुपयांची कॅश सूट देत आहे.
Hyundai Aura: Hyundai Aura ही सेडान सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे. हि कार खरेदी केल्यास 10 हजार रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय, तुम्हाला 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल. ही सूट ऑफर या कारच्या सर्व प्रकारांवर लागू होईल.
Hyundai Grand i10 Nios: Hyundai Grand i10 हॅचबॅक सेगमेंट या सेगमेंटमधील प्रीमियम कारपैकी एक आहे, ज्याच्या टर्बो प्रकारामुळे तुम्हाला 35 हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. जर तुम्ही या कारचे CNG व्हेरिएंट विकत घेतले तर तुम्हाला 10 हजार रुपयांची सूट मिळेल. यासोबतच तुम्हाला 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील दिला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
- Rupali Patil | “शरद पवारांवर खापर कशाला फोडता” ; रुपाली पाटलांनी शिवसेना-शिंदे गटाला सुनावले
- Ramdas Kadam : “मी शिंदे-ठाकरेंना एकत्र आणणार, अखेरपर्यंत भगवाच धरणार”; रामदास कदमांना आश्रू अनावर
- Ramdas kadam | “आदित्यचं वय काय आणि तो…”; रामदास कदम यांनी व्यक्त केली नाराजी
- Ramdas Kadam : “उद्धवजी तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना…” ; रामदास कदम ढसाढसा रडले
- Sanjay Raut | “आंधी नही, तुफान है मोदी…”; संजय राऊतांचा व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
