Share

Ramdas Kadam : पक्ष संपला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे पवारांसोबतच आहेत, हे का होतंय?; रामदास कदमांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

Ramdas kadam । मुंबई : आज शिवसेना नेते रामदास कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. तसेच यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फ़ोट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी डाव साधला. संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

रामदास कदम म्हणाले कि, सेना कोसळताना पहावत नाही. आज माझे वय सत्तर वर्ष आहे. गेली 52 वर्ष मी शिवसेनेसाठी काम करत आहे हे सांगताना त्यांना आश्रू अनावर झाले. तर पुढे उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवर एवढं प्रेम का हेच तर मला कळत नाही. कोडं उलगडत नाही. रात्री दोन दोन वाजता उठून बसतोय. झोप लागत नाही. जेवण जात नाही. तेच माझंही दुख आहे. आपला पक्ष फुटतोय. आपल्या पक्षात उभी फूट पडतेय. तरी उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडत नाही. पक्ष संपला तरी चालेल. पण ते पवारांसोबत आहेत. हे का होतंय? नेमकं आजूबाजूला सांगणारे लोक कोण आहेत?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी ते म्हणाले कि ‘शिवसेनेत आम्ही 52 वर्ष घालवली. तुम्ही भीक दिली असं कसं म्हणू शकतात. आम्ही शिवसेनेसाठी सर्वकाही केलं. उद्धवजी का तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना सोडत नाहीत,’ असा सवाल कदम यांनी केला. यावेळी बोलताना सतत त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते. मागच्या 52 वर्षांत शिवसेनेसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी यावेळी माहिती दिले. तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हणतात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!