Share

IND vs BAN | इशान किशन आणि विराट कोहलीने रचला ‘हा’ विक्रम 

Published On: 

🕒 1 min read

IND vs BAN | चट्टोग्राम : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. आज बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमधील तिसरा सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघातील फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी एक नवा विक्रम रचला आहे. या सामन्यादरम्यान विराट आणि इशानने सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. हा सामना सुरू होण्याआधी बांगलादेशचा कर्णधार लिटल दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत होता. प्रथम गोलंदाजी करत बांगलादेश संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यानंतर विराट कोहली आणि युवा सलामीवीर इशान किशन यांनी उत्कृष्ट भागीदारी करत हा पराक्रम केला.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये जखमी झाला होता. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये इशान किशनला तिसऱ्या सामन्यात सलामी देण्याची संधी मिळाली होती. दरम्यान, इशान किशन आणि विराट कोहली यांनी या सामन्यादरम्यान, सर्वात मोठी भागीदारी केली आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यामध्ये आठ वर्षांपूर्वी सर्वात जास्त धावांचा विक्रम नोंदवला गेला होता. यामध्ये अजिंक्य आणि विराटने 213 धावांची भागीदारी केली होती. विराट आणि अजिंक्यच्या नावाचा रेकॉर्ड इशान आणि विराटने मोडला आहे. विराट आणि इशानची भागीदारी ही भारतीय संघातील तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये ही भागीदारी सातव्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली आणि इशान किशन यांनी 290 धावा काढत नवा इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाने अनेक मोठ्या भागीदारी केल्या आहेत. मात्र, यामध्ये आजच्या सामन्यात झालेली विराट कोहली आणि इशान किशन यांच्यामधील ही भागीदारी सर्वोच्च ठरली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची 213 धावांची भागीदारी आहे. तर या यादीच्या तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आणि वीरेंद्र सहवाग यांच्यामधील 203 धावांची भागीदारी आहे. तर या यादीत चौथ्या क्रमांकावर के. एल. राहुल आणि रोहित शर्मा यांची 180 धावांची भागीदारी आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची 178 धावांची भागीदारी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली आणि इशान किशन यांनी 1978 मधील सौरभ गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या श्रीलंकेविरुद्धच्या 252 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला आहे. विराट आणि इशान यांनी 190 चेंडू मध्ये 290 धावा काढल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!