Share

Ramdas Kadam : शरद पवार आणि अजित पवार दोघांनी शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा गंभीर आरोप

Published On: 

Ramdas kadam । मुंबई : राज्याच्या राजकारणात रोज मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काल माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. तर आज त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. तसेच यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फ़ोट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

रामदास कदम म्हणाले कि, शरद पवारांनी डाव साधला. संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सेना कोसळताना पहावत नाही. आज माझे वय सत्तर वर्ष आहे. गेली 52 वर्ष मी शिवसेनेसाठी काम करत आहे हे सांगताना त्यांना आश्रू अनावर झाले.

दरम्यान, तुम्ही भीक दिली असं कसं म्हणू शकतात. आम्ही शिवसेनेसाठी सर्वकाही केलं. उद्धवजी का तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना सोडत नाहीत,’ असा सवाल करताना कदम यांना आश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना सतत त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते. मागच्या 52 वर्षांत शिवसेनेसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी यावेळी माहिती दिले. तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं रामदास कदम यावेळी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!