Share

Bindass Kavya Found : अखेर औरंगाबादची यूट्यूबर ‘बिनधास्त काव्या’ इटारसीमध्ये सापडली

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद येथील प्रसिद्ध यूट्यूबर बिनधास्त काव्या काल पासून बेपत्ता होती. तिला शोधण्यासाठी तिच्या पालकांनी तिच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ शेअर करत सगळ्यांची मदत मागितली होती. अशातच आता काव्या सापडली असल्याची बातमी समोर आली आहे. काव्या इटारसी (मध्य प्रदेश) रेल्वे स्टेशनवर सापडली आहे. तसेच ती तिच्या घरी अर्थात लखनऊला चालली असल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा व्हिडीओः

https://youtu.be/jf-GzhVsXlg

काव्या च्या यूट्यूब चॅनेलला 4 मिलीयन पेक्षा जास्त सब्सक्राईबर्स आहेत. तिच्या चॅनेलचं नाव ‘बिनधास्त काव्या’ असं आहे. या तरुणीने अगदी कमी वयात यशाची उंच भरारी घेतली आहे. मात्र, तिच्या अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आई-वडील प्रचंड चिंतेत होते. काव्याच्या कुटुंबियांना आणि मित्रवर्गीयांना देखील तिच्याबाबत विचारपूस करण्यात आली. तरी देखील तिचा पत्ता लागला नव्हता. संबंधित तरुणीचा मोबाईल घरी होता तसेच तिच्याकडे मोजकेच पैसे असल्याने तिचे पालक अतिशय चिंतेत होते.

अभ्यासाच्या कारणावरून तिचे वडील तिच्यावर रागावले होते. त्यानंतर ती रागाच्या भरात निघून गेली असावी, असे तिच्या वडिलांनी तक्रार अर्जात म्हटले होतं.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!