🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूकांच वारं घुमू लागलं आहे. सर्व पक्ष निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. यातच गणेशोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हापासून शिंदे गट आणि मनसे पक्षामध्ये आगामी निवडणुकांसाठी युती होणार का?, याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अमित ठाकरे ?
शिंदे गटाबरोबर युती करायची की नाही याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे. आज मनसेकडून गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्र किेनाऱ्यांवर जमा होणारा कचरा साफ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी त्यामध्ये अमित ठाकरेही उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी पत्रकांशी संवाद साधला.
समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याचा आमचा विचार आहे. आम्ही लवकरच आम्ही सत्तेत येऊ आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही ही यंत्रणा उभारणार असल्याचं अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मनसेच्या या स्वच्छता मोहिमेत पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणी सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Bindass Kavya Missing | औरंगाबाद येथील प्रसिद्ध युट्युबर ‘बिनधास्त काव्या’ बेपत्ता ; आई-वडिलांची आर्त हाक
- Amravati | “लव्ह जिहाद पहिल्यांदाच झाले आहे?, याआधी कुठे गेली होती नवणीत राणा”
- Shinde vs Thackeray | एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना देणार होते मोठा झटका! शिवसेना खासदाराच्या मुलाने केले ऑपरेशन फेल
- Navneet Rana | “नवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही” ; पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा इशारा
- Congress vs Bjp | राहुल गांधींनी घातला 41 हजारांचा टी-शर्ट! भाजपच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर! म्हणाले, “मोदींचा सूट…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
