🕒 1 min read
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमनसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हीडिओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तसेच याकुब मेमन याच्या कबरीचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आला आहे. या सर्व प्रकरणावरुन भाजप नेते मोहित कंबोज उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. दरम्यान यावर बोलताना शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोहित कंबोज यांना गंभीर इशारा दिला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “आम्हाला टार्गेट केले जात आहे. घाणेरड्या गोष्टींमध्ये आम्हाला अडकवणे, म्हणजे यात त्यांचे संस्कार दिसत आहेत. तुमच्या आई-वडिलांना पक्षातील मोठ्या नेत्यांनी दिलेले संस्कार तुम्ही विकून टाकत आहात. नको ते संस्कार घेऊन तुम्ही बाहेत येत आहात. मी स्वता अडवाणींना पाहीलं आहे. अटल बिहारी वाजपेयींबरोबर आमचे फोटो आहेत. आम्ही त्यांना भेटायला देखील होतोय सुषमा स्वराज अॅडमिट असताना मी दिल्लीत जाऊन त्यांना भेटली आहे. फडणवीस साहेबांना देखील मी भेटले आहे. इतके संस्कारी नेते तुमच्याकडे असताना तुम्ही असे कसे वागू शकता. कसं ऐवढं घाण राजकारण करु शकता. प्रत्येक गोष्ट घेऊन उद्धवजींना चिपकवन हे बारा भोंगे ठरवणार ( मोहित कंबोज). कंबोज तु असशील पैसेवाला, ते तुझ्या घरात. फालतूगिरी करण्याचे बंद कर.”
मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा –
भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कंबोज म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला गणेशोत्सवाच्या किंवा दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. कंबोज म्हणाले की, अडीच वर्षानंतर हिंदूंनी हे दोन्ही सण ज्या उत्साहाने साजरे केले. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतो. याआधीही कंबोज ठाकरे कुटुंबावर घणाघाती हल्ला करत आहेत.
हिंदुत्वापुढे याकुब मेमनच्या कुटुंबाचा दबाव अधिक ?-
कंबोज इथेच थांबले नाहीत, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आणखी एक ट्विट केले. हिंदुत्वापुढे याकुब मेमनच्या कुटुंबाचा दबाव अधिक असल्याचे दिसते, असे ते म्हणाले. कदाचित याच कारणामुळे त्यांनी समाधी बनवण्यात उघडपणे मदत केली, पण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या किंवा त्यांच्या विसर्जनाच्या आनंदाबद्दल एक ट्विटही केले नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Bindass Kavya Missing | औरंगाबाद येथील प्रसिद्ध युट्युबर ‘बिनधास्त काव्या’ बेपत्ता ; आई-वडिलांची आर्त हाक
- Amravati | “लव्ह जिहाद पहिल्यांदाच झाले आहे?, याआधी कुठे गेली होती नवणीत राणा”
- Shinde vs Thackeray | एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना देणार होते मोठा झटका! शिवसेना खासदाराच्या मुलाने केले ऑपरेशन फेल
- Navneet Rana | “नवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही” ; पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा इशारा
- Congress vs Bjp | राहुल गांधींनी घातला 41 हजारांचा टी-शर्ट! भाजपच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर! म्हणाले, “मोदींचा सूट…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
