Share

Aditya Thackeray | “… म्हणून हे सरकार पडणार”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं सरकार पडण्याचा मुहर्त अन् कारण

Published On: 

Aditya Thackeray | औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या शिल्लोड बालेकिल्ल्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तांरांचा चांगलाच सामाचार घेतला. तसेच राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यादरम्यान, मी ज्या मतदारसंघात आलो आहे तिथल्या गद्दाराच्या मनात घाण आहे. घाणेरडं राजकारण सुरू आहे. गलिच्छ राजकारण सुरू आहे. शिवीगाळ करत आहेत. सुप्रियाताईंना जे बोलले ते बोलू नका, ते बोलण्यासारखं नाही. हा सत्तेचा माज आहे. सत्तार यांच्या मनात काळं आहे. मंत्री होताच सत्तेची मस्ती चढली. टीईटी घोटाळा केला, शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.

एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही. खोके सरकारचे कृषीमंत्री आहेत. प्राथमिक सर्व्हे झाले का? मतदारसंघात फिरले का? पुणे-नाशिकमध्ये कोण कृषीमंत्री आहे हेच माहिती नाही. मला छोटा पप्पू म्हणता, मी स्वीकारतो, पण शेतकऱ्यांना मदत करा, मग मी पप्पू नाव स्वीकारतो, असं म्हणत ओला दुष्काळ कुठे आहे, हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सरकार 2-3 महिन्यांमध्ये कोसळणार आहे कारण तुम्ही गद्दार आहात, असं भाकीत आदित्य ठाकरेंनी केलं आहे. मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. हे गद्दार काय करत होते, यावर आम्ही नजर ठेवली नाही. कोणत्याही बाईला शिवी द्या, तसे संस्कार तुमच्या घरात असतील. या महाराष्ट्रात खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही,’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!