Share

Bindass Kavya Missing | औरंगाबाद येथील प्रसिद्ध युट्युबर ‘बिनधास्त काव्या’ बेपत्ता ; आई-वडिलांची आर्त हाक

Published On: 

महाराष्ट्र देशा | राजाभाऊ मोगल : ‘बिनधास्त काव्या’ या नावाने यूट्यूब चॅनेल चालवणारी ‘काव्या’ शुक्रवार (ता.९) पासून घरातून गायब असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभ्यासाच्या कारणावरून तिचे वडील तिच्यावर रागावले होते. त्यानंतर ती रागाच्या भरात निघून गेली असावी, असे तिच्या वडिलांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. याप्रकरणी फूस लावून पळविणे भा. द.वी. कलम 363 नुसार छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश केदार हे करीत आहेत.

काव्या च्या यूट्यूब चॅनेलला 4 मिलीयन पेक्षा जास्त सब्सक्राईबर्स आहेत. तिच्या चॅनेलचं नाव ‘बिनधास्त काव्या’ असं आहे. या तरुणीने अगदी कमी वयात यशाची उंच भरारी घेतली आहे. मात्र, तिच्या अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आई-वडील प्रचंड चिंतेत आहेत. काव्याच्या कुटुंबियांना आणि मित्रवर्गीयांना देखील तिच्याबाबत विचारपूस करण्यात आली. तरी देखील तिचा पत्ता लागला नाही. संबंधित तरुणीचा मोबाईल घरी असून तिच्याकडे मोजकेच पैसे असल्याने तिचे पालक अतिशय चिंतेत आहेत.

दरम्यान, काव्याच्या आई-वडीलांनी काव्याच्या युट्यूब चॅनेल वर एक व्हिडिओ अपलोड केला असून काव्याच्या शोधासाठी पोलीस मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांचा हा आरोप तपास अधिकारी गणेश केदार यांनी फेटाळून लावत काव्याचे आई- वडीलचं तपासात सहकार्य करीत नसल्याचे म्हटले आहे. तिच्या मित्र-मैत्रिणीचे नंबरही त्यांनी दिलेले नाहीत.

पाहा व्हिडीओः

https://youtu.be/Lv7Azqh_Roo

काव्याच्या आई-वडीलांची आर्त हाक-

प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्याच्या आई-वडिलांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी आर्त हाक दिली आहे. “आमची मदत करा. काव्याला सर्वजण ओळखतात. तिचा मोबाईल पण आमच्या जवळ आहे. तिच्याकडे केवळ दोनच हजार रुपये आहे. शुक्रवार दुपारपासून काव्या घरी परतली नाही. तिच्याबद्दल माहिती मिळाली तर आम्हाला छावणी पोलिसांना कळवा,” अशी विनंती युट्युबर काव्याच्या आईवडिलांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!