Share

Amravati | “नवनीत राणा किंवा त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही”

Published On: 

अमरावती : गुरूवार 8 सप्टेंबर रोजी अमरावतीमधील एक तरूणी बेपत्ता झाली होती. मुलगी सापडत नसल्याने तिच्या पालकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. यानंतर राजापेठ पोलीसांनी एका युवकास ताब्यात घेतले मात्र त्याच्याकडे या मुलीविषयी कुठलीच माहीती नव्हती, सदर युवक हा एका विशिष्ठ धर्माचा असल्याने अमरावतीमधील काही राजकीय नेत्यांनी या प्रकणाला लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि याकरीता खासदार नवनीत राणा यांनीसुध्दा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता. त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील पोलीस कर्मचारी आणि वकिलांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अॅड. असिम सरोदे यांनी नवणीन राणा यांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले अॅड. असिम सरोदे?

अॅड. असिम सरोदे आणि त्यांच्या टीमने खासदार नवनीत राणांना सज्जड दमच भरला आहे. पोलिसांवर जर कोणी बेकायदेशीर दबाव आणणार असेल, तर आमच्या विरोधात राहु. नवनीत राणा किंवा त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही, अशा कठोर शब्दात त्यांनी नवनीत राणा यांना सुनावले आहे.

तसेच, नवणीत राणा यांच्यावर पोलीस कर्मचार्याची पत्नी असलेल्या वर्षा भोयर यांनी निशाणा साधला आहे. तुला लोकांप्रती एवढं प्रेम येतं ना, मग कालंच लव्ह जिहाद पहिल्यांदाच झाले आहे का?.याच्याआधी कितीवेळा तरी अशी प्रकरणं झाली, त्यावेळी तू कुठं गेली होती?, असा सवाल वर्षा भोयर यांनी राणा यांना केला आहे.

पुढे वर्षा असंही म्हणाल्या की, मझ्या काळजाला हे सगळं लागलं कारण मी एक पोलीस पत्नी, मुलगी, सून, आई आणि पोलिसाची बहिण सुद्धा आहे. माझ्या घरातील तीन पिढ्या पोलिसांमध्ये आहे. आज कोण कुठंली ती नवणीत राणा स्वत:ला खासदार म्हणू लागली. तिला अमरावतीमधून खासदार म्हणून निवडून दिलं, तिला अमरावतीमधील लोकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी केंद्रामध्ये पावठलं होतं. नाकी स्वत:चा माज, मस्ती आणि तिचा इगो दाखवण्यासाठी अमरावतीमध्ये तिला निवडुण नव्हतं दिलं.

अमरावती :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!