Share

Aditya Thackeray | “हिंमत असेल तर निवडणुकांना समोर जाणार का?”, आदित्य ठाकरेंचं आव्हान

Published On: 

Aditya Thackeray | औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी औरंगाबाद येथे काल सभा घेतली. यावेळी अब्दुल सत्तांरांनी राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावरुन आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना आव्हान दिलं आहे.

मी देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवर असतो तर राजीनामा देऊन निवडणुकांना सामोर गेलो असतो. त्यामुळे हिंमत असेल तर निवडणुकांना समोर जाणार का? असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिलं आहे. यादरम्यान, हे घटनाबाह्य कृषी मंत्री आक्षेपार्ह विधान करतात. असलं घाणेरडे मी सांगू पण शकणार नाही. असे घाणेरडे बोलणारे कृषिमंत्री तुम्हाला हवेत का ? असे लोक तुम्हाला पक्षात हवेत का, असे सवाल आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केले आहेत.

गद्दार ओके असले तरी महाराष्ट्रात सर्व काही ओके नाही. अनेक उद्योग राज्यात येऊ पाहत आहेत. कारण इथे टॅलेंट आहे. पण किती लोकांना माहित आहे, आपल्या राज्यातून कोणते प्रकल्प गेले?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

अब्दुल सत्तार यांच्या अशा विधानांमुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन होत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव अशा विधानांमुळे खराब होत आहे. मी जर उप मुख्यमंत्री असतो तर बाहेत पडलो असतो, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सरकार 2-3 महिन्यांमध्ये कोसळणार आहे कारण तुम्ही गद्दार आहात, असं भाकीत आदित्य ठाकरेंनी केलं आहे. मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. हे गद्दार काय करत होते, यावर आम्ही नजर ठेवली नाही. कोणत्याही बाईला शिवी द्या, तसे संस्कार तुमच्या घरात असतील. या महाराष्ट्रात खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही,’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!