मुंबई : ‘बिग बॉस’ सिझन १४ मध्ये सर्वांचे लक्ष्य वेधणारी निकी तांबोळी सोशल मिडीयावर कायम सक्रीय असते. निकी सतत सोशल मिडीयावर सुंदर फोटो व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मिडीयावर आता निकीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तिने खूप खुलून दिसणारा टॉप घातला आहे. यामुळे हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हिडीओमध्ये निकीने फिक्कट हिरव्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स घातलेली आहे. निकीचा व्हिडीओ आणि तिचा लुक चाहत्यांना प्रचंड आवडलेला आहे. चाहत्यांच्या यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. निकी तांबोळीचा हा व्हिडीओ हॉटेलच्या लॉबीमध्ये आहे. व्हिडीओमध्ये सर्वांच्या नजरा या निकीच्या टॉपवर आहेत. निकीने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ पोस्ट केलेला आहे.
https://www.instagram.com/p/CdxSVveDwUi/
व्हिडीओच्या हॅशटॅगवरून हा व्हिडीओ दुबईचा असल्याचे समजत आहे. निकी साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. ‘बिग बॉस’ सिझन १४ च्या सिझननंतर तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. ‘बिग बॉस’ सिझन १४ निकी जिंकली नाही पण तिचे चाहते मोठया प्रमाणात वाढले आहेत. यानंतर निकी ‘खतरो के खिलाडी’ या शोमध्ये दिसली होती. तिच्या चाहत्यांना शोमधील तिचे काम खूप आवडले होते.
महत्वाच्या बातम्या :


