Share

कनिका कपूर अडकली लग्नबंधनात! पहा लग्नाचा शाही थाट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘बेबी डॉल’ गाण्याने घराघरांत प्रसिद्ध झालेली गायिका कनिका कपूर लग्नबंधनात अडकली आहे. कनिकाने बॉयफ्रेंड गौतम याच्यासोबत लग्न केल आहे. या जोडप्याचे लग्न लंडन मध्ये झाले आहे. लग्नाचा पहिला फोटोही समोर आला आहे. फोटोमध्ये दोघेही खूप क्युट दिसत आहेत.

लग्नात कनिकाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. त्याचबरोबर दागिने आणि मेकअपने कनिकाच्या लुकला चार चाँद लावला. गौतमने देखील फिकट गुलाबी रंगाचा शेरवानी घातली होती. कनिकाने हळदी आणि मेहंदीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले. हे फोटो देखील मोठया प्रमाणात व्हायरल झाले होते. कनिकाने हळदी समारंभात खूप धमाल केली. तिने पती गौतमसोबत डान्स देखील केला.

कानिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले की, ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करते’. यावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या पोस्टवर कमेंट करताना प्रसिद्ध कॉमेडी स्टार कपिल शर्माने लिहिले की, “दोघांचेही खूप खूप अभिनंदन, देवाचे आशीर्वाद तुमच्यासोबत राहोत. कनिका कपूरचे हे दुसरे लग्न आहे. कनिका कपूरचा पती गौतम हा एक उद्योजक आहे.”

कनिकाचे पहिले लग्न एनआरआय राज चांडोक यांच्याशी झाले होते. पण दोघांचा घटस्फोट झाला होता. लग्नानंतर त्यांना अयान, समारा आणि युवराज अशी तीन मुले देखील आहेत. घटस्फोट झाल्यानंतर कनिका मुंबईला आली आणि नंतर तिचे, ‘जुगनी जी’ गाणे रिलीज झाले. त्यानंतर तीच नशीब बदललं आता तिला प्रसिद्ध गायिका म्हणून ओळखले जाते.

  • महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!