मुंबई : अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर आता वादात सापडला आहे. सिद्धांत कपूर याच्यावर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. बेंगळूरमध्ये झालेल्या एका रेव्ह पार्टीतुन सिद्धांत कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सिद्धांत कपूरला जामीन मिळाल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी अभिनेत्याला पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्यात आले. त्यावेळी चौकशीदरम्यान सिद्धांतने सांगितले कोणीतरी दारू आणि अंमली पदार्थांसह सिगारेट दिले. याबद्दल मला काहीच माहिती नाही असं सिद्धार्थ म्हणाला.
मंगळवारी जामिन मिळाल्यानंतर सिद्धार्थने त्याच्या अटकेबद्दल माहिती सांगितली तो म्हणाला, पोलिसांना तपासामध्ये मी सहकार्य करेल. बंगळुरूचे पोलीस खरोखरच जीव वाचवण्याचे चांगले काम करत आहेत. यासंदर्भात डीसीपी भीमाशंकर गुलेद यांनी सांगितले की, सिद्धांतचा दावा आहे की त्याच्या मद्यपानात काहीतरी मिसळले होते आणि त्याला याची माहिती नव्हती.
जाणून घ्या कोण आहे नेमका सिद्धांत कपूर?
सिद्धांत कपूर हा एक अभिनेता आहे. त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये असिस्टंस डायरेक्टर म्हणून देखील काम केले आहे. सिद्धांत शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांचा मुलगा आहे. २०१३ मध्ये सिद्धांत कपूरने त्याच्या ऍक्टिंग करिअरला सुरवात केली होती. अभिनय क्षेत्रामध्ये येण्याच्या आगोदर सिद्धांताने डीजे म्हणून करिअरची सुरवात केली होती. सिद्धांताने गायन क्षेत्रात देखील कामगिरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :


