Share

Bacchu Kadu | शिंदे गट सोडण्यावर बच्चू कडू यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, “थोडी नाराजी आहे, पण…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात दोन आमदार असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज (बुधवार, 10 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या 50 आमदारांपैकी 40 आमदार हे उद्धव गटापासून वेगळे झालेले शिवसेनेचे आणि 10 अपक्ष आणि यामध्ये प्रहार पक्षाचे बच्चू कडू होते. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. एकाही अपक्षाला संधी दिली नाही. यामुळे बच्चू कडू नाराज आहेत.

बच्चू कडू म्हणाले, “थोडी नाराजी आहे, पण शिंदे गट सोडून दुसरीकडे जाण्याइतपत नाही.” एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट झाली.

शिंदे गटाला मंत्रीपदासाठी पाठिंबा दिला नाही-बच्चू कडू

बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे काहीशी नाराजी आहे. पण ही नाराजी क्षणिक आहे. पुढे जाऊन त्याचा पुन्हा विस्तार होणार आहे. मी शिंदे गटाला मंत्रीपदासाठी पाठिंबा दिला नाही. काही मुद्द्यांवर पाठिंबा दिला होता. त्या मुद्यावर काम दिसत नसेल तर विचार करावा लागेल. आम्हाला मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले त्यामुळेच आम्ही मागणी केली आहे. आश्वासन दिले नसते तर आम्ही मंत्रीपद मागितले नसते.”

राजकारणात कधीतरी दोन पाऊलं मागे यावंच लागत-

मंत्रिमंडळाचा विस्तारात नाव नसल्याच्या मुद्द्यावर बच्चू कडू काल (मंगळवार) म्हणाले होते, “मंत्रिपद हा आमचा अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच यात काही शंका नाही. मात्र आम्ही सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी आग्रही राहू. माझ्यामते शिंदे-फडणवीस सरकार हे मित्र पक्ष आणि अपक्षांशिवाय राहूच शकत नाही. कारण अपक्ष आमदारांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळेत्यांचा विचार व्हावा हीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मला शब्द दिला आहे कि, येत्या मंत्रिमंडळाचा विस्तारात तुम्हाला मंत्रिपद देऊ. हा आमचा शब्द आहे. पण राजकारणात कधीतरी दोन पाऊलं मागे यावंच लागत. तसेच आम्हीपण येऊ. कधी दोन पाऊलं पुढे जावं लागत, कधी त्याग करावा लागतो. हे सगळं राजकारणात करावंच लागत. त्याशिवाय राजकारण मजबूत होत नाही.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!