Share

Arvind Sawant | काल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का? अरविंद सावंतांचा बंडखोरांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

Arvind Sawant | मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर काल महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. काल पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार काल मंत्रिपदाची शपथ घेतली. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकही अपक्ष आमदार किंवा एकही महिला मंत्री नाही. तसेच मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्या नावांचा समावेश मंत्रिमंडळात आहे. या मुद्यांवरून विरोधकांकडून आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार टीका सुरु आहेत. यावरून आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

अरविंद सावंत म्हणाले कि, शिवसेनेचे आमदार काल शपथविधीच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायला विसरले. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो आहोत. ज्या घराण्यानं महाराष्ट्रातील सामान्य माणसांना असमान्य केलं. आमच्यासारखे कारकून होते, ते आज मोठ्या पदावर पोहोचलेत. त्या घराण्यानं स्वतःसाठी काय घेतलं. पहिल्यांदा त्या घराण्यातला एकजण आमदार होतोय. तो एक मुख्यमंत्री होतोय तर काय बिघडलं. का त्यांच्या पाठित सुरा खुपसला? असं काय खोटं बोलायचं? उद्धवजी भेटत नाहीत हे तर धादांत खोटंय, असं म्हणत त्यांनी सर्व आरोप खोडून काढत बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि, आम्ही हा मंत्रीमंडळ विस्तार काळजीपूर्वक बघत होतो. यावेळी कोणीही बाळासाहेब किंवा स्वत:च्या आईचे नाव घेतले नाही. मागच्या वेळी अनेकांनी बाळासाहेबांचे तर कोणी आपल्या आईंचे नाव घेतले होते. तसेच यापैकी कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेतले नाही. ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!