Share

मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन!

Published On: 

 

बिहार :  देशाच्या लष्कर ,नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पत्रकार परिषदेत ‘अग्निपथ’  या योजनेची घोषणा केली होती. या नव्या येऊ घातलेल्या अग्निपथ योजनेच्या अंतर्गत आता भारतीय सैन्यात भरती होण्याकरिता काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

सरकारने ‘अग्निपथ भरती योजना’ सुरू केली आहे. मात्र या योजनेला बिहार आणि राजस्थानमध्ये विध्यार्थ्यांकडून जोरदार विरोध होत आहे. लष्करात भरती होण्याची पाहणाऱ्या बिहारमधील विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून, याला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक केली आहे. यामध्ये ट्रेनच्या एका डब्याला आग लागली आहे.

‘अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती होणारे तरुण ४ वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून देशाची सेवा करतील. यातल्या २५ टक्के तरुणांना पुढे संधी दिली जाईल, अशी तरतूद या योजनेत आहे. पण मग उरलेल्या ७५ टक्के तरूणांच काय होणार? त्यांना दुसरी नोकरी देण्याबद्दल सरकारकडे काही तरतूद करण्यात आली आहे का ? असे प्रश्न घेऊन तरुणांनी हे आंदोलन केल आहे.

दरम्यान, हिंसक झालेल्या या आंदोलनाला, यातील आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागत आहे.  पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत आहेत. दहा आंदोलकांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!