Share

IND vs SA : राजकोटमध्ये “अशी” आहे टीम इंडियाची कामगिरी, मालिकेत बरोबरी साधण्याची संधी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम राजकोट येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका सध्या २-१ ने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने दिल्लीतील पहिला आणि कटकमधील दुसरा टी-२० सामना जिंकला होता. तर विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ४८ धावांनी पराभव करून मालिकेत आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

राजकोटमध्ये भारताचा वरचष्मा

ऋषभ पंतला राजकोटच्या मैदानावर सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. कारण या मैदानावर भारतीय संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. या मैदानावर संघाने ३ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी भारतीय संघाला २ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या

या मैदानावरील सर्वोत्तम धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ गड्यांच्या मोबदल्यात २०२ धावा करून विजय मिळवला होता. या सामन्यात युवराज सिंगने ३५ चेंडूत ७७ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ५ षटकार मारले होते.

मैदानावर सर्वात कमी धावसंख्या

या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्येबद्दल बोलायचे झाल्यास, बांगलादेशच्या संघाने २०१९ मध्ये येथे ६ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताकडून त्यांना ८ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.

https://twitter.com/BCCI/status/1537095734339641344?s=20&t=PJjHwHktqqNpLZoCxmDjOA

हेड टू हेड सामन्यांमध्येही भारताचा वरचष्मा

दोन्ही देशांमधील हेड टू हेड सामन्यांबद्दल बोलायचे तर, दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत १७ सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने १० विजय मिळवले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने केवळ ८ विजय मिळवले आहेत. जेव्हा भारतीय संघ राजकोटमध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल, तेव्हा त्याला हा आकडा आणखी सुधारण्याची संधी असेल. भारतीय संघात चौथ्या सामन्यासाठी कोणते बदल होणार नसल्याची शक्यता आहे. मागील खेळायला केलेल्या तिन्ही सामन्यात भारताने कोणतेही बदल केलेले नाहीत.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत – इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!