Share

“भविष्यात दोन भारतीय संघ तयार होतील”, BCCI सचिव जय शाह यांचं सूचक वक्तव्य!

Published On: 

मुंबई : २०२१मध्ये, अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत सहभागी झाली, तेव्हा शिखर धवनच्या नेतृत्वाखाली एक युवा टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यासाठी पाठवण्यात आले, राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक होता. भारताचे दोन संघ एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असावी. पण आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी आगामी काळात दोन भारतीय संघ एकाच वेळी खेळताना दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, ”मी एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी चर्चा केली आहे आणि आमच्या रोस्टरमध्ये नेहमीच ५० खेळाडू असतील. भविष्यात, भारतीय कसोटी संघ एका देशात मालिका खेळत असेल आणि दुसरा संघ वेगळ्या देशात मालिका खेळत असेल अशी परिस्थिती तुमच्यासमोर असेल. आम्ही त्या दिशेने जात आहोत जिथे आमच्याकडे एकाच वेळी दोन राष्ट्रीय संघ तयार असतील.”

एकाच वेळी दोन राष्ट्रीय संघांच्या वक्तव्यानंतर जय शाह यांनी भविष्यातील आयपीएलबाबतही मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, ”हा एक पैलू आहे ज्यावर आम्ही काम केले आहे. पुढील ICC FTP कॅलेंडरपासून, आयपीएलमध्ये अडीच महिन्यांची विंडो असेल, जेणेकरून सर्व अव्वल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी होऊ शकतील. आम्ही विविध बोर्ड तसेच आयसीसीशी चर्चा केली आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!