Share

“दिल्ली पोलिसांनी माझे कपडे फाडले” ; काँग्रेस महिला खासदाराचा गंभीर आरोप, पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ईडीने केलेल्या चौकशीच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनावरून वाद सुरूच आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत काल पक्षनेत्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच काही नेत्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाच्या एका महिला खासदाराचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महिला खासदार पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

शशी थरूर यांनी ट्विट केले आहे की, “कोणत्याही लोकशाहीत हे अपमानास्पद आहे. महिला आंदोलकाला अशी वागणूक देणे हे प्रत्येक भारतीय शिष्टाचाराचे उल्लंघन करते, परंतु लोकसभा खासदारासोबत असे करणे ही खालच्या स्तरावरची गोष्ट आहे. मी दिल्ली पोलिसांच्या वर्तनाचा निषेध करतो आणि यावर कारवाईची मागणी करतो.”

व्हिडिओमध्ये तामिळनाडूमधील करूरमधील काँग्रेस खासदार जोतिमणि यांनी आरोप केला आहे की, दिल्ली पोलीस कर्मचारी त्यांचे कपडे फाडून त्यांना गुन्हेगाराप्रमाणे घेऊन गेले. व्हिडिओमध्ये जोतिमणि यांनी त्यांचा फाटलेला कुर्ता दाखवला. तसेच  त्याच्यां पायात फक्त एकच बूट आहे.

https://twitter.com/ShashiTharoor/status/1537122107028652035

त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “दिल्ली पोलिसांनी काल आमच्यावर क्रूरपणे हल्ला केला. त्यांनी माझे कपडे फाडले, माझे बूट काढले आणि मला इतर महिला आंदोलकांसह एका गुन्हेगाराप्रमाणे बसमध्ये नेले.”

पोलिसांनी पाणी देण्यासही नकार दिल्याचा आरोप जोतिमणि यांनी केला. ते म्हणाले, “बसमध्ये माझ्यासह 7-8 महिला आहेत. आम्ही वारंवार पाणी मागत आहोत. मात्र त्यांनी नकार दिला. आम्ही बाहेरून पाणी आणण्याचा प्रयत्न केला असता, ते विक्रेत्यांना सांगत आहेत की, आम्हाला पाणी देऊ नका. त्यांनी व्हिडिओमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ईडीसमोर हजर झाले. त्याचवेळी सत्ताधारी भाजपच्या ‘सूडाच्या राजकारणा’विरोधात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!