Share

मुंबईकरांसाठी दानवेंकडून मोठी घोषणा; एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात

Published On: 

मुंबई : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईकरांना आनंदाची मोठी घोषणा केली आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करत असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे. ऐन उन्हाळ्यात हा निर्णय घेतल्याने मुंबईकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

“वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरात किती कपात करायला हवी, असं आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना विचारत होतो. त्यावर कोणी म्हणत होतं ३० टक्क्यांनी दर कमी करा, कोणी म्हणत होतं २० टक्क्यांनी दर कमी करा. मात्र देशाचे पंतप्रधान हे नेहमी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्हीही सामान्य माणसासाठी निर्णय घेत वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात करत आहोत”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

तसेच याआधी २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना १३५ रुपये मोजावे लागत होते. मात्र तिकिटाची ही रक्कम यापुढे ६५ रुपये इतकी असणार आहे. तसंच ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्यांकडून याआधी २०५ रुपये तिकीट आकारले जात होते, हे भाडे आता १०० रुपये इतके असणार असल्याची माहितीही दानवे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!