मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवारांसह (ajit pawar) भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे नाव वाहतुकीचे नियम मोडण्यात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. त्यात सर्वात पुढे अजित पवार यांचा नंबर लागतो. त्यांच्या दोन वाहनांवर २७,८०० रुपयांचा दंड होता. त्यांनी सर्व रक्कम ऑनलाईन भरली आहे.
तर सर्वाधिक १४,२०० रुपये दंड भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर आहे. गृहमंत्री वळसे-पाटील यांना ५,२०० रुपये तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ६०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे अशा अनेक नेत्यांची वाहनांवरील अनेक प्रकारची चलने पेंडिंग असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान नियमांचे नेहमी पालन करा, असे आवर्जून सांगणारे अजित पवार यांनीच वाहतुकीचे नियम मोडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यात अनेक भाजप नेत्यांचाही समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “नवाब मलिक जेलमध्ये तरी मंत्री मंडळाच्या निर्णयावर…”, निलेश राणेंनी ठाकरे सरकारला सुनावले
- “…तर त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
- “मोदींकडून महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- राणा दाम्पत्य यांच्या अडचणीत वाढ; जामिनाला पोलिसांकडून कडाडून विरोध
- “उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नसून तिथे…”, योगी सरकारने केलेल्या ‘त्या’ कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

