🕒 1 min read
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक दुचाकी संदर्भात केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून सरकारनं इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना नवीन मॉडेल लाँच करण्यास बंदी घातल्याची माहिती मिळत आहे. तसेच केंद्र सरकारकडून असा निर्णय घेण्यात आला असला तरी सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ई-दुचाकी विकण्यास बंधन नाहीत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नितीन गडकरी म्हणाले की,‘केंद्र सरकारकडून नवीन इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास बंदी घालण्यात आली असली तरीदेखील, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या दुचाकी विकण्यास कोणतीही बंधन घालण्यात आलेली नाही’, असे गडकरी म्हणाले.
दरम्यान, गडकरी यांनी सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या आणि यापूर्वी विक्री झालेल्या दुचाकी वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना कंपन्यांना दिल्या आहेत. तसेच गडकरींच्या सूचनेनंतर अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक दुचाक्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Breaking Traffic Rules : अजित पवारांनी भरला २७ हजारांचा दंड
- “दिल्ली, जेएनयू, युपी सरकार पासून भीमा कोरेगाव दंगलीपर्यंत…”- संजय राऊत
- “…तर त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
- “नवाब मलिक जेलमध्ये तरी मंत्री मंडळाच्या निर्णयावर…”, निलेश राणेंनी ठाकरे सरकारला सुनावले
- “राज ठाकरेंनी पोलिसांच्या अटींचं उल्लंघन केलं, तर…”, भीम आर्मीचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
