Share

“…हा तर नोबेल पारितोषिकाचा विषय”, संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला चित्रा वाघ यांचा टोला

Published On: 

मुंबई: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय असल्याचे म्हटले होते. आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत राऊतांना टोला लगावला आहे.

“राज ठाकरेंचे योगींसंदर्भात मतपरिवर्तन कसं झालं, हा पीएचडीचा विषय. इति सर्वज्ञानी जनाब संजय राऊत.. शिवसेनेचे वैचारिक मतपरिवर्तन हा तर नोबेल पारितोषिकाचा विषय आहे.”, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माविआ सरकारवर टीका करत आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’, असे म्हटले होते. यावरच संजय राऊत म्हणाले की, “ही सर्व भोंगेबाजी असून आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय आहे. तसेच उत्तर प्रदेशातील भोंगे उतरवण्यात आले नसून तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले आहे. अशाच प्रकारचे पालन महाराष्ट्रातही करण्यात यावं, अशीच सरकारची भूमिका आहे.”

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!