टीम महाराष्ट्र देशा : इथून मागे कोणताही समाज आरक्षणासाठी आंदोलन करत होता. मात्र आज अतिआरक्षणाच्या विरोधात मोर्चा निघाला आहे. विशेष म्हणजे हा मोर्चा लहान विद्यार्थ्यांनी काढाल आहे. ‘अतिआरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या होत आहे, गुणवत्ता वाचली तर देश वाचेल…’ अशा घोषणा देत बीडमध्ये आज आरक्षणा विरोधात मुकमोर्चा निघाला आहे. विशेष म्हणजे या मोर्चाला सुजाण बीडकरांनी ही उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.
बीडच्या बालाजी मंदिरापासून या मोर्च्याला सुरवात झाली. हा अति आरक्षण विरोधी मोर्चा डॉ. बाबासाहेब अंबेडकर, सुभाषरोड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. अति आरक्षणामुळे गुणवत्ता मृत्यू पावत आहे. सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या मागणीसह मूकमोर्च्यामध्ये हजारो विद्यार्थी, पालक आणि बुद्धिजीवी लोक सहभागी झाले.
दरम्यान या आंदोलनात अति आरक्षण, देशाचे भक्षण अश्या संदेशाच्या टोप्या वापरण्यात आल्या. जिल्हाभरातून अति आरक्षण विरोधी नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भावी पिढी आणि गुणवत्ता वाचवायची असेल तर आरक्षणाबाबत पुनर्विचार झाला पाहिजे. हीच मागणी मोर्चे कराची होती. या बहुउद्देशीय मोर्च्यात हजारो चिमुकले, विद्यार्थ्यांसह, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक, सहभागी झाले होते.
- न्यायालयाचा शंकरराव गडाखांना दिलासा, आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर
- उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, राणा पाटलांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा
- वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या ;सुप्रिया सुळेंंचा राणा पाटलांना टोला
- तयारी विधानसभेची : ईव्हीएम मशीन्स कडेकोट बंदोबस्तात पुण्यात पोचली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
